Sunday, 11 October 2015

1938 - 10th OCTOBER 2015 MANORAMA - TAMIL ACTRESS


 | 

तमिळ अभिनेत्री मनोरमा यांचे निधन

तामिळनाडूतील प्रसिद्ध अभिनेत्री मनोरमा यांचे शनिवारी रात्री निधन झाले. त्या ७८ वर्षांच्या होत्या.
Tamil actress Manorama 1नवी दिल्ली- तामिळनाडूतील प्रसिद्ध अभिनेत्री मनोरमा यांचे शनिवारी रात्री निधन झाले. त्या ७८ वर्षांच्या होत्या. चेन्नईच्या अपोलो रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
रंगभूमीवरुन आपल्या कारकिर्दीची सुरुवात केलेल्या मनोरमा यांनी चित्रपटातही लक्षवेधी भूमिका साकारल्या. त्यांनी मालैयित्ता मंगई ते सिंघम टूपर्यंतच्या अनेक चित्रपटातून आपल्या अभिनयाने रसिक प्रेक्षकांची मने जिंकली.
त्यांनी अण्णा दुराई, एम. जी. रामचंद्रन, एम. करुणानिधी, एन. टी. रामा राव आणि जयललिता या पाच मुख्यमंत्र्यांसोबत चित्रपटांमधून कामे केली आहेत. तसेच शिवाजी गणेशन, तेंगाई श्रीनिवासन, कमल हसन आणि रजनीकांत या दिग्गज कलाकारांबरोबरही चित्रपटांमधून कामे केली.
मनोरमा यांनी आपल्या कारकिर्दीत तमिळ चित्रपटांसह अन्य पाच भाषांमध्ये मिळून १२०० चित्रपटांमध्ये कामे केली आहेत. तर १ हजारपेक्षा जास्त चित्रपटात कामे केल्याने त्यांची गिनिज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंद झाली आहे. त्यांना २००२ साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
Print Friendly
Tags:  |  | 

About 5,000 results (0.38 seconds) 
    Stay up to date on results for anant bhave.
    Create alert
    About 76,200 results (0.50 seconds) 
      Kharghar, Navi Mumbai, Maharashtra - From your Internet address - Use precise location
       - Learn more   




      No comments:

      Post a Comment